Ad will apear here
Next
‘मसाप’चा रेखा ढोले पुरस्कार जाहीर
गोखले, टिपणीस, जोत्स्ना प्रकाशन यांना सन्मानपूर्वक प्रदान करणार
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) पुणे आणि राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राजहंस’च्या एक अभिन्न सदस्य आणि राजहंस प्रकाशनाच्या पुस्तक निर्मितीच्या कार्याचा अविभाज्य घटक असलेल्या रेखा ढोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मसाप’तर्फे साहित्यक्षेत्रासाठी पुरस्कार दिले जातात. या वर्षी मराठी अनुवाद क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा पुरस्कार ज्येष्ठ अनुवादक करुणा गोखले यांना जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हा समारंभ २१ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे होणार आहे. मुखपृष्ठ आणि अंतर्गत सजावटीसाठीचा पुरस्कार ‘नोना आणि सफरचंदाचं झाड’ आणि तीन पुस्तकांच्या संचासाठी राधिका टिपणीस यांना जाहीर झाला आहे. १५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, तर सर्वोत्कृष्ट निर्मितीमूल्याचा पुरस्कार जोत्स्ना प्रकाशनाला ‘नोना आणि सफरचंदाचं झाड’ या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. १० हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

ज्येष्ठ चित्रकार गिरीश सहस्रबुद्धे, श्रीराम गीत, दीपक करंदीकर आणि बंडा जोशी यांच्या निवड समितीने या पुरस्कारासाठी ग्रंथ आणि व्यक्तींची निवड केली. हे पुरस्कार ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. या समारंभाला ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, डॉ. सदानंद बोरसे उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : रविवार, २१ एप्रिल २०१९
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZIQBY
Similar Posts
डॉ. अरुणा ढेरे यांचा ‘मसाप’तर्फे सत्कार पुणे : यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सन्मानाने निवड झाल्याबद्दल डॉ. अरुणा ढेरे यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे (मसाप) कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सत्कार केला.
‘गदिमा...बाबूजी अन् बेरजेचे राजकारण’ पुणे : ‘गीतरामायण कार्यक्रमाच्या रॉयल्टीवरून सुधीर फडके (बाबूजी) आणि ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्यामध्ये दुरावा वाढला. त्यांचा संवाद बंद झाला. महाराष्ट्राचे खूप नुकसान होईल, असे प्रत्येकजण म्हणू लागला. दरम्यान, सैनिकांच्या कल्याण निधीसाठी पुण्यात एका कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते
‘मसाप’तर्फे ३० जुलै रोजी ‘लेखक तुमच्या भेटीला’ पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात कवयित्री आश्लेषा महाजन आणि मीरा शिंदे सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सोमवार दि. ३० जुलै २०१८ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
मांडे, शिरगुप्पे यांना ‘मसाप’चे पुरस्कार पुणे : ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा ‘मसाप जीवनगौरव पुरस्कार’ लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांना, तर वाङ्मयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल परिषदेचा डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार विद्रोही साहित्य चळवळीचे अध्वर्यू आणि सीमाभागातील कार्यकर्ते लेखक प्रा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language